क्राईम डायरी

अंगावरून बैलगाडीचे चाक गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावरून बैलगाडीचे चाक गेल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल, २५ जुलै रोजी सायंकाळी घडली. बंडू सखाराम शेळके (३८, रा. भडगाव ता. बुलडाणा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतात जात असताना बैलगाडीतून पडले. बैलगाडीचे चाक अंगावरून गेले. काल दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना लगेच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रायपूर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: