क्राईम डायरीमुख्य बातम्या

अंधारात उभ्या ट्रकला धडकले दुचाकीस्वार बापलेक!; चिखलीजवळील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उभ्या ट्रकला धडकून मोटारसायकलस्वार बापलेक गंभीर जखमी झाले. ही घटना २७ ऑगस्‍टच्‍या पहाटे सव्वा तीनच्‍या सुमारास मेहकर- चिखली रोडवरील हॉटेल हंडीबागसमोरील एमआयडीसी चिखलीच्‍या पाटीजवळ घडली. चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी पोहोचून जखमींना बुलडाणा येथील जिल्हा रुग्‍णालयात हलवले. या प्रकरणी कोणतीही काळजी न घेता ट्रक रस्‍त्‍यावर उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रकचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

विजय संपत जाधव (५५) व अजय विजय जाधव (दोघे रा. अकोला) अशी जखमींची नावे आहेत. दीपक देविदास खंदारे (रा. कोळगाव खुर्द ता. मालेगाव जि. वाशिम) असे ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक सचिन चौहाण यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताची माहिती कळताच ते घटनास्‍थळी गेले होते. ट्रक (क्र. MH 26 AD 2186) मेहकरकडून चिखलीकडे येत होता, तर जाधव बापलेक मोटरसायकलने (क्र. MH 30 AH 7038) पुण्यावरून अकोल्याला जात होते. चिखली जवळील हाॅटेल हंडिबागसमोर पहाटे तीनला ट्रक रस्त्यात उभा असल्याने व ट्रकच्या मागील इंडिकेटर सुरू नसल्याने ट्रक रस्त्यात उभा असल्याची कल्पना बापलेकाला आली नाही. ते मोटरसायकलसह त्या ट्रकला धडकले व जखमी झाले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: