क्राईम डायरी

अंधारात लपलेल्या तरुणास शेगावमध्ये घेतले ताब्‍यात!

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गुन्हा करण्याच्‍या बेतात अंधारात लपून बसलेल्या तरुणास शेगाव शहर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई आज, ६ जुलैला पहाटे पावणेतीनच्‍या सुमारास अग्रसेन चौकात करण्यात आली.

बाबुशाह शौकतशाह (२५, रा. अशोकनगर अकोट फैल, अकोला) असे या संशयिताचे नाव आहे. सहायक फौजदार लक्ष्मण नारायण मिरगे यांच्‍या तक्रारीवरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना तो मिळून आला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्‍याची झडती घेण्यात आली. तपास नापोकाँ श्री. बोरसे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: