क्राईम डायरीमुख्य बातम्या

अखेर मृतदेह बोलला… अनैतिक संबंधातून महिलेचा गळा दाबला, नंतर मृतदेह दिला पाण्यात फेकून!; लोणार तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 35 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी खळेगाव (ता. लोणार) येथे समोर आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधातून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पाण्यात फेकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत गणेश आनंदा सानप (38, रा. खळेगाव) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 ऑगस्ट रोजी प्रमिला गायकवाड हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर येताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. मृतक महिलेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार मृत महिलेचे गावातीलच गणेश आनंदा सानप याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो नेहमी तिच्या घरी येणे जाणे करायचा.

त्यानेच माझ्या मुलीचा गळा दाबून खून केला असावा, असा संशय महिलेच्या वडिलांनी व्यक्त केला होता. गणेश सानप याने त्याच्या शेतातच महिलेचा गळा दाबून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शेतातील पाण्यात बुडून मरण पावल्याचा बनाव करण्यासाठी मृतदेह ओढ्यातील पाण्यात टाकल्याचे समोर आल्याने गणेश सानप याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बीबी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम व्यवहारे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: