क्राईम डायरी

अडीच लाखांचा गांजा खामगावमध्ये पकडला

खामगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एमआयडीसी परिसरातून अवैधरित्या गांजाची तस्करी सुरू होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी  काल हा गांजा पकडला.
आंध्रप्रदेशातून पिंपळगाव राजाकडे (ता. खामगाव) हा गांजा एपी-27 क्यू 6133 या महिंद्रा मॅक्स वाहनातून चालला होता. एमआयडीसी पोलीस चौकीसमोर हे वाहन पकडण्यात आले. यातून गांजाचे 5 पोते वजन 85 किलो अंदाजे किंमत 2 लाख 55 हजार व चारचाकी वाहनासह 5 ते 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तिघांना ताब्यात घेतले आहे. तपास ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: