बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

गावकरी उतरले रस्त्यावर… बुलडाणा-रायपूर मार्गावरील वाहतूक ठप्प!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : रस्त्याची दैना झाली, खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे अशी गत, वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत अशी बुलडाणा तालुक्‍यातील रायपूर- बुलडाणा मार्गाची दुरवस्था… लोकप्रतिनिधींना विनवण्या केल्या अन्‌ अधिकाऱ्यांना निवेदने दिलीत, पण कोणीच गांभीर्याने घेतले नाही! रस्त्याचे अन्‌ वाहनधारक, गावकऱ्यांचे हाल कायम राहिले… यामुळे संतप्त झालेल्या रायपूर वासीयांनी आज, 18 मार्चला सकाळी 10 वाजेच्या सुमारास चक्क रस्त्यावर ठिय्या मांडला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व सरपंच संजय उबरहंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्‍व केले. नेते अन्‌ गावाचे कारभारी यांच्या नेतृत्वात झालेल्या या रास्ता रोकोत नितीन राजपूत, नीलेश राजपूत, मोहमद साबीर, मदन फोलाने, रमेश देशमुख, संदीप कांबळे, सुधाकर तायडे आदी सहभागी झाले. आंदोलनामुळे रस्त्‍यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: