क्राईम डायरीमुख्य बातम्या

अनोळखी व्यक्ती जिल्हा रुग्णालयात भरती;सांगेना कोण आहे, कुठला आहे…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः डोक्याला मार लागल्याने एका अनोळखी व्यक्तीला बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात काल, सहा जुलैला सायंकाळी भरती करण्यात आले. रायपूर (ता. चिखली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. आजपर्यंत त्याच्याजवळ कोणीही नातेवाईक नाही. तो कोण आहे, कुठला आहे हे त्‍याला सांगता येत नाही. सडपातळ बांधा, मोठे केस, वाढलेली दाढी, काळा सावळा रंग, अंगात काळी पॅन्ट, पांढरा शर्ट अशा वर्णनाचा व्यक्ती परिचयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: