क्राईम डायरीमुख्य बातम्या

अपमान असह्य झाला…सेवानिवृत्त शिक्षकाने घरातच घेतले विष!; पायजामाच्‍या नाड्यातील चिठ्ठीत सांगितले आत्‍महत्‍येचे कारण

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः घरासमोर राहणाऱ्या युवकाने काठीने मारहाण केल्यामुळे अपमान असह्य होऊन सेवानिवृत्त शिक्षकाने घरातच विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना म्‍हैसवाडी (ता. मलकापूर) येथे 4 एप्रिलला घडली. शिक्षकाच्‍या पायजामाच्‍या नाड्यात चिठ्ठी आढळल्‍याने आत्‍महत्‍येचे कारण समोर आले.

सोपान रूपचंद धाडे (75) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. त्‍यांनी रिंगाव (ता. मुक्‍ताईनगर) येथील आपल्या लहान बहिणीच्‍या घराचे बांधकाम म्‍हैसवाडीतील संजय नारायण खवले याच्‍या मध्यस्‍थीने दुसऱ्या एका व्‍यक्‍तीला 70 हजार रुपयांत ठरवले होते. बांधकाम करणाऱ्याने 40 हजार रुपयांची उचलही केली होती. मात्र हवे तसे बांधकाम केले नाही. त्‍यामुळे धाडे यांनी संजय खवले याच्‍याकडे नाराजी व्‍यक्‍त केली. त्‍यातून वाद होऊन संजयने धाडे यांना ग्रामस्‍थांसमोर मारहाण केली. मारहाणीमुळे झालेला अपमान असह्य होऊन धाडे यांनी घरात विष घेऊन आत्‍महत्‍या केली. पायजामाच्‍या नाड्यात सापडलेल्या चिठ्ठीत धाडे यांनी सर्व वृत्तांत लिहून ठेवला. आत्‍महत्‍येस संजय खवले हाच जबाबदार असल्याने त्‍याला अटक करण्यात आली. या प्रकरणी धाडे यांचा मुलगा नितीनने तक्रार दिली. तपास पोलीस निरिक्षक श्री. मिर्झा करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: