क्राईम डायरीमुख्य बातम्या

अबब… खामगावात पकडले बेहिशोबी साडेसतरा लाख रुपये!; मनोज अग्रवाल, विजय राठी यांच्‍या कारमध्ये घबाड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बेहिशोबी साडेसतरा लाख रुपये कारमधून घेऊन येणाऱ्या खामगावच्‍या दोन व्‍यावसायिकांना पकडण्यातआले. काल, 4 मार्चला रात्री साडेआठच्‍या सुमारास खामगाव पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

खामगाव येथील व्यावसायिक मनोज अग्रवाल आणि विजय राठी अमरावतीवरून मोठी रक्कम घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल 4 मार्चला रात्री 8 च्या दरम्यान शहरातील बाळापूर नाक्याजवळ नाकेबंदी करण्यात आली. रात्री 8.30 वाजता मनोज अग्रवालची कार (क्र. एमएच 28 बीके 9990) बाळापूर नाक्याजवळ आली असता पोलिसांनी ती अडवत तपासणी केली असता त्यात 17 लाख 50 हजार रुपये मिळून आले. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही रक्कम चांदूर रेल्वे येथील एका जमीन व्यवहाराशी संबंधित असल्याचे सांगितले. मात्र या रकमेशी संबंधित कोणताही कागदोपत्री पुरावा अग्रवाल यांच्याकडे नसल्याने पोलिसांनी रक्कम जप्त केली आहे. याबाबत मनोज अग्रवाल आणि विजय राठी यांना कागदोपत्री पुरावा सादर करण्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा मनोज अग्रवालविरुद्ध आर्थिक व्यवहाराशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: