बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

अबब… त्यांनी पकडला 701 वा साप, तोही चक्क कोब्रा!; विहिरीच्या कपारीतून केली सुखरूप सुटका!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील पळसखेड भट्ट येथील जनार्दन मेरत यांच्या विहिरीच्या कपारीत विषारी कोब्रा असल्याची माहिती शेतकर्‍याने सर्पमित्र संदीप कांबळे यांना दिली. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता त्यांच्या शेतात धाव घेऊन या सापाची सुटका केली.

पळसखेड भट शिवारात मेरत यांची गावाला लागूनच शेती आहे. शेतीतील विहिरीवर नेहमीप्रमाणे कामासाठी 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता गेलेले शेतकरी जनार्दन मेरत यांना विहिरीत कोब्रा साप दिसून आला. त्यांनी त्याला न मारता रायपूर येथील सर्पमित्र संदीप दीपक कांबळे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन साप पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अत्यंत अवघड जागेवर अडकलेल्या सापाला पकडण्यासाठी जिवाची पर्वा न करता कांबळे यांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडून जीवदान दिले. कांबळे यांनी सात वर्षांत विविध जातींच्या 700 सापांना पकडून सुखरूप जंगलात सोडून दिले आहे. साप शेतकर्‍यांचा मित्र असून, त्याचा जीव न घेता सर्पमित्रांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: