बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

अब सिर्फ 100!; सक्रीय रुग्‍ण घटले, किनगाव जट्टूच्‍या पुरुषाचा बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आता 100 रुग्‍ण कोरोनाचे आहेत. त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयांत उपचार सुरू अाहेत. आज, 22 जूनला नव्या 40 रुग्‍णांची भर पडली असून, 59 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान किनगाव जट्टू (ता. लोणार) येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2754 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2710 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 648 तर रॅपिड टेस्टमधील 2062 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : येळगाव 1, देऊळघाट 1, रस्ताळा 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : गांगलगाव 1, मुंगसरी 1, देऊळगाव घुबे 1, मालगणी 2, देऊळगाव राजा शहर : 3, देऊळगाव राजा तालुका : उंबरखेड 1, भिवगण 1, सिंदखेड राजा तालुका : भंडारी 1, दत्तापूर 2, नागझरी 1, खामगाव शहर : 3, संग्रामपूर तालुका : कोलद 1, शेगाव तालुका : हिंगणा 1, नांदुरा तालुका : दोंडगाव 3, जिगाव 2, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, लोणार तालुका : दाभा 1, खुरमपूर 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : उकळी 2, मलकापूर तालुका : घिर्णी 1, उमाळी 2, परजिल्हा जाफराबाद (जि. जालना) 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 40 रुग्ण आढळले आहे.

49 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 49 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 552096 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85578 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 997 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86333 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 100 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 655 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: