चंदेरी

अभिनेत्री सनी लिओन झाली मुंबईकर; घेतले १६ कोटींचे घर

मुंबई : मायानगरी मुंबईत आपले एक हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. बॉलिवूड कलाकारही त्याला अपवाद नाहीत. कारण कलाकारांचे सर्वाधिक काम हे मुंबईतच असते. त्यामुळे महानगरीत स्वतःचे घर घेऊन कधी तरी स्वप्नपूर्तीचा आनंद घेतात. आता बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री मुंबईत घर घेऊन मुंबईकर झाली आहे. ही अभिनेत्री आहे सनी लिओन. होय सनी लिओन हिने मुंबईत अंधेरी भागात तब्बल १६ कोटींचे घर विकत घेतले आहे. सनी लिओनचे हे घर अटलांटिस नावाच्या आलिशान इमारातीत बाराव्या मज्ल्यावर आहे. हा एक फाईव्ह बीएचके फ्लॅट आहे. चार हजार चौरस फूट एरिया असलेल्या या घरात सर्व अत्याधुनिक सोयी, सुविधा आहेत. विशेष म्हणजे या घर खरेदीवर तिला सरकारकडून घसघशीत सवलतदेखील मिळाली आहे.३१ मार्चपर्यंत राज्य सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत जाहीर केली होती. राज्यात अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला.सनी लिओननेही जी प्रापॅर्टी खरेदी केली त्यावर तिला लाखो रुपयांचा फायदा झाला. सरकारच्या निर्णयाचा चातुर्याने लाभ घेत दुहेरी फायदा करून घेणारी सनी लिओन खरोखरच व्यवहारतज्ज्ञ म्हणावी लागेल. नाही का?

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: