अमडापूरच्या बँकेत बसली होती… तिच्यासोबत घडली धक्कादायक घटना!

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेच्या पर्समधून 98 हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना 4 जानेवारीला अमडापूर (ता. चिखली) येथील स्टेट बँकेत घडली. सीमा पुरुषोत्तम सपकाळ (34, रा. करतवाडी) या स्टेट बँकेत बसलेल्या असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील 98 हजार रुपये गायब केले. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पैसे कुणी चोरले, हे शोधणे आता अमडापूर पोलिसांपुढे …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेच्या पर्समधून 98 हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना 4 जानेवारीला अमडापूर (ता. चिखली) येथील स्टेट बँकेत घडली. सीमा पुरुषोत्तम सपकाळ (34, रा. करतवाडी) या स्टेट बँकेत बसलेल्या असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील 98 हजार रुपये गायब केले. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पैसे कुणी चोरले, हे शोधणे आता अमडापूर पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. या बँकेला सुरक्षारक्षकही नाही हे विशेष. आजूबाजूच्या सर्व खेड्यांचे व्यवहार या बँकेतून होतात. नियमित वर्दळ असते. असे असताना सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असा सुरक्षात्मक गोष्टींची व्यवस्था नसल्याने ग्राहकांसोबत अशा प्रकारची घटना घडल्यास तपासात मोठी अडचण होऊन जाते.