क्राईम डायरीमुख्य बातम्या

अमडापूरमध्ये शाळा, आरोग्‍य केंद्र चोरट्यांच्‍या निशाणावर!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत शाळा फोडण्याचे सत्र चोरट्यांनी अवलंबले आहे. काल, २८ जुलैला चिखली तालुक्‍यातील अमडापूर येथील अमर विद्यालय चोरट्यांनी फोडून टीव्‍हीसह १०३०० रुपयांचा माल लंपास केला.

मुख्याध्यापक वसंत उत्तमराव देशमुख यांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार केली आहे. काल सकाळी साडेसहाला त्‍यांना शाळेतील मुख्य लिपिक प्रदीप मानकर यांनी शाळेत चोरी झाल्याचे सांगितले. शिपाई सुरेश मारके शाळेत आले तेव्हा मुख्याध्यापक कार्यालय, शिक्षक कक्ष, सहकारी पतसंस्थेचे कपाट, लिपीक कक्ष व एक वर्ग खोलीचे दरवाजे तोडलेले दिसले. मुख्याध्यापकांनी शाळेत येऊन पाहणी केली असता ७ हजारांचा टीव्‍ही, २ हजारांचा सीपीयू, १ हजारांचा एम्पिफायर, पतसंस्थेच्या कपाटातील दहा ग्रम चांदीचा सिक्का (किंमत २०० रुपये)2व नगदी १०० रुपये असा एकूण १०३०० रुपयांचा माल चोरून नेला. मुख्याध्यापक तक्रार नोंदवत असतानाच अमडापूर येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील सतीश मुख्यतार सिंग तवर यांनी पोलीस ठाण्यात येऊन आरोग्‍य केंद्रातील टीव्‍हीसुद्धा चोरांनी चोरून नेल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

मेहकरातून पल्सर चोरीला
मेहकरातील महादेव वेटाळ येथील धनंजय रघुनाथ बोरकर यांची बजाज पल्सर दुचाकी लंपास झाल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. २४ जुलै रोजी बुरकुल हे त्याच्या सोनाटी येथील शेतात मोटारसायकलने गेले होते. समोरील रस्ता खराब असल्याने त्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २८ एके ९९६८) सोनाटी मेन रोडच्या बाजूला उभी करून शेतात गेले. दुपारी चारला ते परत मोटारसायकल ठेवली तिथे आले असता गाडी दिसली नाही. शोध घेऊनही मिळून न आल्याने त्यांनी २७ जुलै रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मेहकर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: