बुलडाणा (घाटावर)

अयोद्ध्येतील श्रीराम मंदिरासाठी मेहकरमध्ये 15 पासून निधी संकलन

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर बांधण्यासाठी सध्या देशभरात निधी संकलन सुरू आहे. मेहकरमध्येही निधी संकलन कार्यालय सुरू झाले असून, या तालुका कार्यालयाचे उद्घाटन प. पू. 1008 महंत स्वामी अखंड चैतन्यपुरीजी महाराज (श्री क्षेत्र निलकंठेश्‍वर संस्थान मंठा जि. जालना) यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता अ‍ॅड. ठाकरे यांच्या पुंडलिका निवास, डॉ विलास वर्‍हाडे यांचे दवाखान्याच्या बाजूला लोणार वेस मेहकर येथे होणार आहे. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान निधी संकलन होणार आहे. तालुक्यातील रामभक्तांनी अधिकाधिक निधी समर्पित करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: