क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेत अत्याचार, 24 वर्षीय तरुणाला अटक; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या वाडी (ता. जळगाव जामोद) येथील 24 वर्षीय मोहन भाऊराव तायडे याच्या मुसक्या आवळण्यात जळगाव जामोाद पोलिसांना यश आले आहे. मुलीसह त्याला पकडून आणले आहे. पीडित मुलीच्या घरी मोहनची नेहमी येजा होती. चांगले संबंधसुद्धा होते. यातूनच त्याने त्या मुलीशी संबंध बनवले. तिला मोटारसायकलवर बसवून 31 डिसेंबरला पळवून नेले. तिथेही तिच्यावर अतिप्रसंग केला. त्याच्याविरुद्ध मुलीच्या पित्याने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. तपास पोलीस उपनिरिक्षक सतीश आडे, विकास गव्हळ करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: