क्राईम डायरीमुख्य बातम्या

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार; मेहकर तालुक्‍यातील खळबळजनक घटना, संशयित ताब्‍यात

जानेफळ (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला 21 वर्षीय तरुणाने प्रेमाच्‍या जाळ्यात अडकवून पळवून नेले. तिच्‍यावर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. या अत्‍याचाराचे चित्रिकरण करून ते व्‍हायरल करण्याची धमकी दिली. ही खळबळजनक घटना पार्डी (ता. मेहकर) येथे आज, 16 मे रोजी समोर आली आहे. जानेफळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा दाखल करून तरुणाला ताब्‍यात घेतल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

गोपाळ बंडू शिंदे (21, रा. पार्डी, ता. मेहकर) असे संशयिताचे नाव आहे. गावातीच पीडितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. पीडितेचे वडील मजुरीसाठी बाहेरगावी जात असतात. ही संधी साधून गोपालने 14 वर्षीय पीडितेला गोड बोलून, लग्‍नाचे आमिष दाखवून प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले व एकांतात भेटणे सुरू केले. 25 एप्रिलला सकाळी 11 वाजता मोटारसायकलवर बसवून कणका (ता. मेहकर) येथे पळवून नेले. तिथे तिच्‍या मनाविरुद्ध रात्रभर जबरीने लैंगिक अत्‍याचार केला. कणकावरून दुसऱ्या दिवशी तिला लोणार भागात नेले. तिथे सतत 3 दिवस तिच्‍यावर पुन्‍हा अत्‍याचार केला. त्‍यानंतर पीडित मुलगी 28 एप्रिलला दुपारी घरी परतली. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.

याबाबत तिच्‍या आई-वडिलांनी गोपालला जाब विचारला असता त्‍याने मुलीला जीवे मारून टाकेन. तिची नग्‍नावस्‍थेतील शूटिंग मी व्‍हायरल करेन, अशी धमकी त्‍याने दिली. एवढ्यावरच न थांबता त्‍याने 13 मे रोजी त्‍याचे मुलीसोबतचे नको त्‍या अवस्‍थेतील फोटो व्‍हायरल केले. तपास ठाणेदार राहुल गोंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: