क्राईम डायरीमुख्य बातम्या

अवघ्या पंचविशीतच त्‍याने उचलले टोकाचे पाऊल!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 25 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 12 मार्चला दुपारी 12 च्‍या सुमारास बुलडाणा शहरातील जांभरून रोड परिसरात घडली. बबलू ऊर्फ प्रकाश प्रल्हाद खिल्लारे असे या युवकाचे नाव आहे. घरात टिनाच्या लाकडी दांड्याला त्याने गळफास घेतला. माहिती मिळताच घटनास्‍थळी धाव घेऊन पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: