क्राईम डायरी

अवघ्या 5 हजारांसाठी मांडला छळ; विवाहितेने गाठले पोलीस ठाणे

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मावस बहिणीच्या लग्नात आंधण घ्यायचे असल्याने माहेरवरून 5 हजार रुपये घेऊन ये असे म्हणून 23 वर्षीय विवाहितेचा छळ मांडल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे समोर आला आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.माहेरवरून पैसे आणण्यास नकार दिला म्हणून पती किशोर पानझडे (31), सासरा अंबादास (65), सासू सौ. बेबीताई (55, सर्व रा. हिंगणा कारेगाव) व सौ. दीपाली गोपाल डांगे (27, रा. बडेगाव, ता. अकोट, जि. अकोला) यांनी सौ. पूजाचा छळ मांडला होता. मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सौ. पूजाने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास शेख रब्बानी करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: