क्राईम डायरीमुख्य बातम्या

अविवाहित सालीला मेव्‍हण्याने केले प्रेग्‍नंट; 4 महिने वारंवार बलात्‍कार!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बहिणीला सोडून देण्याची धमकी देत 28 वर्षीय सालीवर वारंवार बलात्‍कार करणाऱ्याविरोधात चिखली पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. साली गर्भवती राहिल्याने हा धक्‍कादायक प्रकार समोर आला. गेल्‍या 4 महिन्‍यांपासून तो तिच्‍यावर वारंवार बलात्‍कार करत होता.
28 वर्षीय युवती आईसोबत राहते. तिला आजार असल्याने तिचे लग्‍नही अद्याप होऊ शकले नाही. तिला लहान बहीण असून, ती सध्या प्रेग्‍नंट आहे. लॉकडाऊनमुळे पती बेरोजगार झाल्‍याने दोघे गावीच राहायला आले आहेत. सासू व बायको नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने सालीवरच बलात्‍कार केला. डिसेंबर 2020 पासून वारंवार तो बलात्‍कार करत राहिला. यातून युवती प्रेग्‍नंट राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने तपासणीसाठी रुग्‍णालयात गेले असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी 8 मार्चला चिखली पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्‍यावरून पोलिसांनी आरोपीस अटक केली. तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्‍या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. चव्‍हाण करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: