क्राईम डायरी

अवैधरित्या गोंद काढून वाहतूक; तिघांना पकडले, 6 फरारी; जळगाव जामोद तालुक्यात कारवाई

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील राखीव वनातून अवैधरित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणार्‍या तिघांना वनविभागाने आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 हजार रुपयांचा 210 किलो गोंद जप्त केला आहे. आरोपींत कृष्णा तुळशीराम बारकल (21, रा.कुंवरदेव, ता. जळगाव जामोद), अनिल सुकलाल जमरा (21, रा. कुंवरदेव ता. जळगाव जामोद), कैलास राजू (19, रा. कुंवरदेव ता. जळगाव जामोद) यांचा समावेश असून, त्यांचे 6 साथीदार फरारी झाले आहेत. आरोपींविरुद्ध वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: