क्राईम डायरी

आईला म्हणे चप्पलसाठी पैसे दे… पैसे घेऊन गेला अन् गळफास घेतला!; सिंदखेड राजा तालुक्यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चप्पल आणण्यासाठी पैसे घेऊन घराबाहेर पडलेल्या युवकाने गावशिवारातील डोंगराच्या पायथ्याशी बेलाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना कंडारी (ता. सिंदखेड राजा) येथे 6 फेब्रुवारीला सायंकाळी समोर आली.
संदीप नारायण जायभाये (22, रा. कंडारी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी त्याचा दिवसभर शोध घेतला पण तो मिळून आला नाही. पोलीस पाटील प्रकाश सानप व मृतकाचा भाऊ गैबीनाथ जायभाये यांनी साखरखेर्डा पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार जितेंद्र आडोळे, पीएसआय दीपक राणे, प्रकाश मुंढे, सुरजसिंह इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. संदीपच्या पश्‍चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: