क्राईम डायरीमुख्य बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाने घेतला गळफास, खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोठ्यात टिनपत्र्याच्‍या लोखंडी अँगलला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाने आत्‍महत्‍या केली. ही घटना खामगाव शहरातील गोपाळनगरात आज, 26 मार्चला सकाळी समोर आली.

नानाराव जयराम पारखे असे या वृद्धाचे नाव आहे. त्‍यांनी आजाराला कंटाळून आत्‍महत्‍येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. पत्‍नी आशाबाई यांना नानारावांनी आत्‍महत्‍या केल्याचे दिसून आले. त्‍यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: