क्राईम डायरीमुख्य बातम्या

आजी-आजोबांकडे मुलीला सोडताे म्‍हणाला, मुलीसह काका गायब!; मलकापूर तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चुलत काकानेच 7 वर्षीय पुतणीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राजू कालू मानकर (35, रा.  मेथा खेडी, ता. झरनिया, जि. खरगोन मध्यप्रदेश, ह. मु. हरणखेड, ता. बोदवड, जि. जळगाव) याच्‍याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीचे वडील भुरा मानकर व आरोपी हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मूळचे मध्यप्रदेशातील असेलेले मुलीचे वडील वडजी (ता. मलकापूर) येथे कुटूंबासह राहतात व मजुरी करतात. संशयित आरोपी हा हरणखेड येथे कुटूंबासह राहतो व मजुरी करतो. 24 फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी हा भुरा मानकर यांना भेटायला आला होता. त्यावेळी जाताना त्याने पुतणी दुरमा भुरा मानकर हिला आजी- आजोबा कडे हरणखेड येथे काही दिवस राहण्यासाठी घेऊन  जातो, असे सांगितले.मात्र आरोपी आणि मुलगी हरणखेड येथे पोहचलेच नाहीत. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी आतापर्यंत नातेवाईक व इतरत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. त्यामुळे  9 मार्च रोजी मुलीच्या वडिलांनी त्यांच्या चुलत भावाविरोधात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: