क्राईम डायरीमुख्य बातम्या

आठवडी बाजारांत गर्दीचा फायदा घेत चोरले 24 महागडे स्मार्टफोन!; एलसीबीने आवळल्या मुसक्या!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध आठवडी बाजारांतील गर्दीचा फायदा घेत तब्बल 24 महागडे स्मार्टफोन चोरणार्‍याच्या मुसक्या अखेर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. महागडे मोबाईल चोरायचे अन् कमी किमतीत विकायचे हा त्याचा धंदाच झाला होता. नीलेश जगन शिंदे (रा. धानोरी, ता. चिखली) असे या ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. सायबर क्राईम विभागाने दिलेल्या तांत्रिक माहितीवरुन एलसीबीने जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन जणांना ताब्यात घेत त्यांना विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्यांच्याजवळ असलेले दोन्ही चोरीचे मोबाईल त्यांनी नीलेश जगन शिंदे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. तपास पथकाने नीलेशला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने जिल्ह्यातील विविध आठवडी बाजारांत गर्दीचा फायदा घेत 24 अँड्रॉइड फोन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 24 स्मार्टफोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या नेतृत्त्वात सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, प्रदीप आढाव, पोलीस अंमलदार संजय मिसाळ, गजानन आहेर, भारत जंगले, विजय सोनोने, विजय वारुळे, सायबर पोलीस ठाण्यातील राजू आडवे, कैलास ठोंबरे यांनी पार पाडली.

ओळख पटवून मोबाईल घेऊन जा…

गेल्या काही काळात आठवडी बाजारातून ज्यांचे मोबाईल चोरीला गेले असतील अशांनी चिखली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच ओळख पटवून आपले मोबाईल घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: