महाराष्ट्र

आता महाराष्ट्रात ट्विटर बॉब…

परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बवर नेत्यांचे ट्विट चर्चेत
संजय राऊत म्हणतात, ‘हम को तो बस नए रास्तों की तलाश‘
अमृता फडणवीस म्हणतात, ‘बात तो बहोत दूर तलक जाएगी‘
किरीट सोमय्या म्हणाले, ‘वाझे नोटा मोजायचे मशीन घेऊन का फिरत होते ते आता समजले’

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या कथित आरोप प्रकरणानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण त्याचबरोबर अनेक नेत्यांनी ट्विटरवर सूचक संदेश देऊन एकमेकांना इशारे-प्रतिइशारे देणे सुरू केले आहे. त्या वक्तव्यांचीही राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे बोलताना परमबिरसिंग यांच्या वक्तव्यावर गंभीर भाष्य केले आहे. सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. मुख्यमंत्री व पवारसाहेब त्याची सत्यता तपासून बघतीलच. मात्र अशाप्रकारचे आरोप होत आहेत हे धक्कादायक आहे. सरकारला दीड वर्षे झाले.पण आता आपले पाय प्रत्येकानेच तपासले पाहिजे नक्की जमिनीवर आहेत का? सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. दुसरीकडे राऊत यांनी ट्विरटवर सुप्रभातचा मॅसेज करताना ‘हमको तो बस तलाश नए रास्तों की है. हम है मुसाफिर एैसे जो मंझिल से आये है‘ असे ट्विट केले होते. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना नवा कोणता रस्ता शोधत आहे असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे.

दुसरीकडे शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी न सोडणार्‍या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याप्रकरणातही ट्विटरवरून सेनेवर निशाना साणला आहे. वाझे प्रकरणावरून दोन दिवसांपूर्वी ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे! सांगा पाहू कोण कोणास म्हणाले‘ असे ट्विटर अमृता यांनी केले होते.आता परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बवर अमृता यांनी ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने मे कितनों की जान जाएगी?‘ असे ट्विट केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे आणखी एक नेते किरीट सोमय्या यांनी वाझे यांच्याकडे झडतीत नोटा मोजण्याचे मशीन सापडले होते, याचा संदर्भ देत ‘आता लक्षात आले वाझे नोटा मोजण्याचे मशीन घेऊन का फिरत होते.‘ असा तिरकस टोमणा सरकारला लगावला आहे. या वेगवेगळ्या वक्तव्यांतून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: