देश-विदेश

आधी बलात्कार… नंतर लग्न… फिरायला घेऊन गेला अन्‌ दिलं टेकडीवरून ढकलून!

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये एका तरुणाने आपल्या तरुण पत्नीला फिरायला नेलं आणि नैनिताल या थंड हवेच्या ठिकाणावरील उंच टेकडीवरून धक्का देऊन खून केला. ही घटना एक महिन्यानंतर उघडकीस आली आहे. पत्नी पळून गेल्याचं त्यानं खोटंच सांगितलं.

हे खून प्रकरण म्हणावं तितकं साधं नाही. अतिशय गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे. गेल्या वर्षी एका युवतीनं लग्नाच्या आमिषानं आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसानं त्या तरुणाला अटक केली. तो तिहार तुरुंगात असतानाच संबंधित तरुणीने बलात्कराची तक्रार मागं घ्यायचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात तिनं आपल्याला संबंधित तरुणाशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं. तिच्या प्रतिज्ञापत्रानुसार संबंधित तरुणाची जामिनावर सुटका करण्यात आली. तो जामिनावर सुटल्यानंतर दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर चार- पाच दिवसांत त्या दोघांचं भांडण झालं. संबंधित तरुणी माहेरी निघून गेली. काही दिवसांनी विशालने तिला फोन केला आणि घरी परत येण्यास सांगितलं; पण रेवतीच्या आईने मुलीला सासरी पाठवण्यास नकार दिला. तिला सासरी खाणं-पिणं दिलं जात नव्हतं, तिला धमकावलं जात असे, अशी कारणं तरुणीच्या आईनं दिली; मात्र तिच्या पतीनं तिची समजूत काढली आणि तिला घेऊन गेला.

काही दिवस चांगले गेले. नंतर दोघांत रुसवे-फुगवे, भांडण मिटणं सुरूच होतं. त्यात त्यानं तिला नैनितालला फिरायला नेलं. उंच टेकडीवरून ढकलून दिलं. तिचा संपर्क होत नसल्यानं पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्यानं ती पळून गेल्याचं सांगितलं. आपण तिच्याशी संपर्क साधत आहोत; परंतु तिचा फोन स्वीच्ड ऑफ आहे, असं तो थोटं सांगत राहिला. अखेर तरुणीच्या पालकांनी थट न्यायालयात धाव घेतली. त्यामुळं पोलिसांनी तपासाला गती दिली. दोघांचं शेवटचं लोकेशन नैनितालमध्ये होतं, असं तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर उंच टेकडीवरून ढकलून दिल्याची कबुली दिली. तिचा मृतदेह शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

 
 

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: