क्राईम डायरीमुख्य बातम्या

आमची पुतणी पळवली…तुला माहिती आहे सांगतोस की नाही म्‍हणत बेदम चोपले!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्या भावाने आमची पुतणी पळवली आहे. तुला माहीत आहे. सांग तो कुठे आहे, असे म्हणत 7 जणांच्या टोळक्याने 22 वर्षीय तरुणास मॅक्सिमो वाहनात बसवून बेदम मारहाण केली. ही घटना काल, 4 एप्रिलला रात्री बोरगाव काकडे (ता. चिखली) येथे घडली. याप्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून नायगाव बुद्रूक (ता. चिखली) येथील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पवन दिलीप खानझोडे (22, रा. बोरगाव काकडे ता. चिखली) हा काल रात्री बोरगाव काकडे शिवारात शेतात झोपायला गेला होता. तो रात्री झोपलेला असताना 11 च्या दरम्यान पांढऱ्या मॅक्सिमो गाडीतून 7 जण आले. त्यांनी पवनला गाडीत टाकले आणि बेदम मारहाण केली. आमची पुतणी तुझ्या तुझ्या भावाने पळवली आहे, तो सांग कुठे आहे, असे म्हणत बेदम चोपले व जीवे मारण्याची धमकी. आज सकाळी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार  दिल्‍याने पोलिसांनी अमोल रामभाऊ जवंजाळ, प्रशांत एकनाथ गायकवाड, सचिन अरुण जवंजाळ, अविनाश सुभाष म्हस्के, विजय संजय जवंजाळ, आशिष गजानन जवंजाळ, संतोष रंगराव जवंजाळ (सर्व रा. नायगाव बु, ता. चिखली) अशा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: