बुलडाणा (घाटावर)

आमदार रायमूलकरांनी घेतली पंचायत राज समितीची बैठक

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय रायमूलकर यांची पंचायतराज समितीवर प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर 20 जानेवारी रोजी विधान भवन मुंबई येथे समिती कक्षात त्यांनी प्रारंभिक बैठक घेतली.

सुरुवातीला समिती प्रमुख म्हणून आमदार संजय रायमूलकर यांचे विधिमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आमदार रायमूलकर यांनी ग्रामविकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार जयंत पाटील, किशोर पाटील(घाडगे), अनिल पाटील, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, किशोर आप्पा पाटील, किशोर दराडे, श्रीमती मेघना बोर्डीकर, श्रीमती प्रतिभा धानोरकर या सदस्यांची उपस्थिती होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: