बुलडाणा (घाटावर)

आमदार श्‍वेताताई महाले यांच्या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, 11 फेब्रुवारीला आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांच्या सेवालय जनसंपर्क कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांचा स्मृतीदिवस समर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी अयोध्येत राम मंदिरासाठी निधी समर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी डॉ प्रतापसिंह राजपूत, पंडितराव दादा देशमुख (शहराध्यक्ष), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुकाध्यक्ष), शेख अनिस शेख बुढन, सुरेंद्र पांडे, प्रा. राजू गवई (गटनेते), शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, सुभाष आप्पा झगडे, दिलीप डागा, युवराज भुसारी, सागर पुरोहित, सचिन कोकाटे, विक्की हरपाळे, स्वीय सहायक सुरेश इंगळे, अक्षय भालेराव व इतरांची उपस्थिती होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: