बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना; कार्यालयातील 2 कर्मचारीही बाधित!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना संकट गडद होत असतानाच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, आमदार गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल आज, 6 मार्चला पॉझिटिव्ह आला आहे.
सोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार आहे. आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. आज 6 मार्चला आमदार गायकवाड घरी येणार असले तरी घरी किंवा कार्यालयावर सध्या कुणी संपर्क करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. रविवारी संध्याकाळी आमदार गायकवाड पुन्हा मुंबईला जाणार आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: