क्राईम डायरीमुख्य बातम्या

आयशर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार महिला ठार, एक जखमी; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयशर वाहनचालकाने मागून दिलेल्या धडकेत 55 वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना खामगाव शहरातील शिवाजीनगरात 24 जानेवारीच्या रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
सौ. शोभाबाई रमेश काटे (रा. शिवाजीनगर खामगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. महादेव दत्तात्रय साळुंखे हे ड्युटी संपल्यावर 24 जानेवारीला रात्री 11.30 च्या दरम्यान एमआयडीसीमधून आपल्या मोटारसायकलने सौ. शोभाबाई काटे यांना घरी सोडण्यासाठी जात असताना मधुबनजवळ पांढर्‍या आयशरच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवून साळुंखे यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे ते दोघे खाली पडले. त्यांना त्वरित परिसरातील नागरिकांनी सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारा दरम्यान आज, 25 जानेवारीला सौ. शोभाबाई काटे यांचा पहाटे 3.30 च्या सुमारास मृत्यू झाला. जखमी महादेव साळुंखे यांच्यावर सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिवाजी नगर पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: