बुलडाणा (घाटावर)

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा : जिल्हा परिषद शिक्षणविभागातर्फे बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार खाजगी विना अनुदानित, कायम विना अनुदनित, स्वयअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचीत दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. त्यानुसार 2021-22 या वर्षातील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सुचना 20 जानेवारी 2021 शासन स्तरावर देण्यात आल्या आहे.

सदरची प्रक्रियेबाबत संभाव्य वेळापत्रक शासनाने rte25admission.maharasharahtra.gov.in संकेस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 9 ते 26 फेब्रुवारी 2021 कालावधी असून प्रवेश लॉटरीची सोडत दि. 5 ते 6 मार्च 2021 राहणार आहे. यांची जिल्ह्यातील सर्व शाळा पालक यांनी नोंद घ्यावी. तसेच आर. टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये करीता माहितीकरीता पालकांनी rte25admission.maharasharahtra.gov.in वेबासाईटला भेट देवून सर्व सूचना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहावी. जिल्ह्यातील जास्तीत पालकांनी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: