बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

आश्चर्यम्‌! संग्रामपुरात 103 पॉझिटिव्ह! जिल्ह्यात आढळले 478 रुग्ण; 6 रुग्ण दगावले

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुरळक पेशंटमुळे खमंग चर्चा व वादाचा विषय ठरलेल्या संग्रामपूर तालुक्यात तब्बल 103 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा कमी रुग्ण आढळले असतानाच 6 जण दगावले आहेत.

कोरोना जिल्ह्यात धुमाकूळ घालत असताना व आकडे 4 आकड्यांत पोहोचले असतानाही तुरळक संख्येत रुग्ण निघणारा संग्रामपूर तालुका उपहास व सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अलीकडे तालुक्यात दुहेरी आकड्यात पेशंट निघायला सुरुवात झाली. मात्र आजच्या अहवालात संग्रामपूर तालुक्‍यात तब्बल 103 पॉझिटिव्ह रुग्‍ण निघाल्याने यंत्रणा व पुढारी हादरून गेले !

आज जिल्ह्यात केवळ याच तालुक्यात तिहेरी आकडा आलाय, हे विशेष! याशिवाय बुलडाणा 49, चिखली 68, मेहकर 56, जळगाव 31, मलकापूर 32 या तालुक्यांत रुग्णसंख्या भरीव आहे. दुसरीकडे खामगाव व शेगाव प्रत्येकी 24, देऊळगाव राजा 17, नांदुरा 23, लोणार 21, मोताळा व सिंदखेडराजा तालुक्यात प्रत्येकी 15 अशी  रुग्णसंख्या आहे. दरम्यान, गत्‌ 24 तासांत 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात बुलडाण्याच्‍या महिला रुग्णालयात (4 बळी) मोठा वाटा आहे. खामगावच्‍या सामान्य रुग्णालयातील 2 रुग्‍णदेखील दगावले. यामुळे बळींची संख्या साडेपाचशेवर पोहोचली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: