जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)

आ. श्‍वेताताईंच्या लोकप्रियतेची जादू चालली… 80 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के ग्रामपंचायतींवर भाजप विचारसरणीचे सदस्य निवडून आल्याने मतदारसंघात एकूण 75 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीत जवळपास 46 ग्रामपंचायतींवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. 20 ग्रामपंचायतीवर मित्र पक्ष व सदस्यांच्या सहकार्याने आणि एकूण 65 ठिकाणी भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा आशावाद आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल ग्रामीण जनतेने भाजपच्या बाजूने दिला असून, आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यातील तोरणवाडा, पळसखेड दौलत, कवठळ, शेलोडी, नायगाव बुद्रूक, वाडी ब्रह्मपुरी, ईसोली, कोलारा, भोरसा भोरसी, येवता, दहिगाव, टाकरखेड हेलगा, करवंड, वळती, गोद्री, शिंदी हराळी, सोमठाणा, दिवठाणा, किन्होळा, वैरागड, शेलूद, सवणा, वाघापूर, हरणी, धोत्रा भणगोजी, चांधई (बिनविरोध), मालगणी (बिनविरोध), आमखेड, मुरादपूर, बुलडाणा तालुक्यातील धाड, रायपूर, कुंभेफळ, दुधा, साखळी, माळवंडी, सिंदखेड मातला (बिनविरोध), केसापूर, पळसखेड भट, भडगाव, पांगरी, वरुड, डोमरूळ, म्हसला बुद्रूक, दहिद खुर्द, अटकळ,सावळी या ठिकाणी जनमताचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला मिळाला असल्याने आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांचे नेतृत्व खर्‍या अर्थाने उजळून निघत आहे. पहिल्यांदाच भाजपचे ग्रामीण भागात वर्चस्व केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सबका साथ सबका विकास यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्‍वास ठेवून भरभरून मतांचे दान दिल्याने बहुसंख्येने भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळेच चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील गावांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. तसेच पारंपरिक अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या धाड, ईसोली, सवणा, कोलारा, रायपूर, साखळी बुद्रूक, करवंड या ग्रामपंचायतीवर भाजपचे सदस्य मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा जल्लोष चिखली तालुक्यातील अनेक गावांत भाजपचे पॅनल निवडून आल्याने नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांच्या उपस्थितीत जाऊन जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला. निवडणूक निकालाच्या आजच्या सकाळपासूनच जत्थेच्या जत्थे आमदार सौ. श्‍वेताताई महाले आणि इतर भाजपा पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी येत होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विकासासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे अभिवचन नवनिर्वाचित सदस्यांना आमदार सौ. महाले पाटील यांनी दिले.

प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध ः आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील

ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपावर विश्‍वास दाखविला आहे. त्यांच्या विश्‍वासाला कुठेही तडा जाऊ न देता प्रत्येक गावातील आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची प्रत्येक कामे करण्याचे प्रथम उद्दिष्ट असून, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून त्या सर्वांना सोबत घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याचा मनोदय आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. यावेळी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, रामकृष्ण दादा शेटे (ज्येष्ठ नेते), डॉ. प्रतापसिंह राजपूत (जिल्हा उपाध्यक्ष), पंडितदादा देशमुख (शहराध्यक्ष), भाजप नेते रामदास देव्हडे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुकाध्यक्ष), नगरसेवक विजय नकवाल, नामु गुरुदासानी, गोपाल देव्हडे , सौ. ममताताई बाहेती, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, अनुप महाजन, सुभाष अप्पा झगडे, सौ. मंगला झगडे (नगरसेवक), प्रा. वीरेंद्र वानखेडे, सिद्धेश्‍वर ठेंग, स्वीय सहायक सुरेश इंगळे, बी. एस. म्हस्के, संतोष काळे, शंकर देशमाने, यश टिपारे नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: