क्राईम डायरी

इंजिनिअर पतीचा कारनामा… पत्‍नी काळी अन्‌ स्वयंपाकात तेल जास्त वापरते म्हणून वाचा काय केले…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः तू दिसायला काळी आहे,  स्‍वयंपाकात तेल जास्त वापरते असे म्हणत  विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी इंजिनिअर पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा शहरातील सागवन परिसरातील रहिवासी ज्ञानदेव खर्चे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह पुण्यात इंजिनिअर असलेल्या तुषार भारंबे याच्याशी 10 जुलै 2019 रोजी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर प्रतीक्षाचा छळ सुरू झाला. तू दिसायला काळी आहे. स्वयंपाक नीट येत नाही. तेल जास्त वापरते. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, असे म्हणत वारंवार तिचा छळ करण्यात येत होता. पतीसुद्धा दात खाऊन मारहाण करायचा, असे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. छळ वाढल्याने गरोदर अवस्थेतच प्रतीक्षा 18 एप्रिल 2020 रोजी माहेरी बुलडाणा येथे आल्या. 12 जून 2020 रोजी त्यांना मुलगी झाली. मात्र मुलगी होऊनही पती किंवा अन्य सासरची मंडळी त्यांना भेटायला सुद्धा आले नाहीत. त्यामुळे शारीरिक व मानसिक छळाने अस्वस्थ होऊन प्रतीक्षा (28) यांनी शहर पोलिसात पती व सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पती तुषार भानुदास भारंबे, सासरा भानुदास प्रेमचंद भारंबे, सासू मीनाक्षी भानुदास भारंबे, नणंद अपर्णा भानुदास भारंबे (सर्व रा. कस्तुरीनगर, ता.जामनेर, जि. जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: