क्राईम डायरीमुख्य बातम्या

इच्‍छा पुरी कर, तुला लागेल ते मिळून जाईल…म्‍हणत महिलेचा हात पकडला!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः माझी इच्‍छा पुरी कर, तुला लागेल ते मिळून जाईल…असे म्‍हणत महिलेचा हात पकडून विनयभंग करण्यात आल्याची घटना पळशी झाशी (ता. संग्रामपूर) येथे 11 एप्रिलला सकाळी 10 च्‍या सुमारास घडली.

विक्रम शिवनारायण राठी (45, रा. पळशी झाशी) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या 6 महिन्यांपासून 35 वर्षीय महिलेला त्रास देत आहे. अश्लील इशारे करत येता जाता तो पाठलाग करायचा. फोन करून तू माझ्याशी लग्‍न कर नाही तर तुझी बदनामी करेन, अशा धमक्‍या देत होता. तुझ्या बहिणीचे फोटो माझ्याकडे असून, ते सोशल मीडियावर व्‍हायरल करेन. तरीही तू ऐकत नसेल तर तुझ्या मुलाला चोरीच्‍या गुन्ह्यात जेलमध्ये टाकेन, अशा धमक्‍या तो देत होता. इच्‍छा पुरी कर, तुला हवे ते मिळून जाईल, असे आमिष दाखवायचा. 11 एप्रिलला सकाळी 10 वाजता विक्रमने तिच्‍या घरात घुसून विनयभंग केला. त्‍यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी विक्रमविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: