महाराष्ट्र

इम्तियाज जलील म्हणतात, होय माझी चूक झाली, पण आधी देशातील नियम मोडणार्‍या नेत्यांवर कारवाई करा

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जली यांची विचित्र मागणी

औरंगाबाद : अमिताभ बच्चन- शशी कपूर अभिनित दिवार सिनेमात एक डायलॉग खूप गाजला होता. अमिताभच्या माफीनाम्यावरील सहीसाठी आग्रह धरणार्‍या शशी कपूरला अमिताभ सुनावतो की, मै अकेले साईन नही करूंगा, जाओ पहले उनका साईन लेके आओ, जिन्होने मेरे हातपर मेरा बाप चोर है असे लिहिले होते. उसके बाद तुम जहां कहोगे उसपर मै साईन करूंगा. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज काहीशा अशाच शैलीत पोलीस व शासन यंत्रणेला आव्हान दिले की, कोरोनाच्या अनुंषंगाने बंदी असतानाही माझ्या कार्यालयाबाहेर समर्थक जमले, त्यांनी मास्क लावले नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता जल्लोष साजरा केला. ही आमची चूकच झाली. त्यासाठी आमच्यावर माझ्यावर जरूर कारवाई करा. परंतु मीच काय देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी खा. जलील यांनी केली.

औरंगाबादेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याला लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला. त्यात जलील सर्वात आघाडीवर होते. त्यांनी लॉकडाऊनविरोधात ३१ मार्चरोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली. अचानक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रात्री दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन रद्द करण्याची घोषणा केली. ही बातमी समजल्यावर जलील यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जमून जल्लोष साजरा केला. घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत जलील यांना याचे श्रेय दिले. त्याचे व्हिडिओज व फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर बुधवारी अनेक पक्ष, नेत्यांनी खा. जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.भाजपने तर त्याबाबत ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. त्याआधारे जलील व त्यांच्या समर्थकांवर कारवाई होण्याची शक्यात आहे. त्या अनुषंगाने खा. जलील यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्यात आपली चूक झाली. पण नियम मोडणार्‍या इतर नेत्यांवर कारवाई करा, असे आव्हान प्रशासनास दिले आहे. पोलीस प्रशासन खा.जलील यांचे ‘दिवार‘स्टाईल आव्हान स्वीकारणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: