क्राईम डायरी

इव्‍हिनिंग वॉक ठरला शेवटचा… वाहनाने उडवल्‍याने वृद्ध ठार; खामगावातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संध्याकाळी फिरण्यास गेलेल्या पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक देऊन ठार केल्याची घटना खामगाव शहरातील घाटपुरी बायपासवर 21 फेब्रुवारीच्‍या सायंकाळी घडली. रामेश्वर तुकाराम खंडारे (65, रा. गोपाळनगर, खामगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

रामेश्वर खंडारे रोज संध्याकाळी पायी फिरावयास जात असतात. काल, 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक 6 बायपासकडे फिरण्यास गेले. सायंकाळी 6:45 वाजताच्या सुमारास घाटपुरीचे ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ देशमुख यांनी रामेश्वर खंडारे यांचा मुलगा सुधीर (43) यांना दूरध्वनीवरून कळवले की, जुना टोल नाका ते तुळशी ढाबा दरम्यान तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्‍यामुळे सुधीर तातडीने कुटुंबासह घटनास्थळी धावले. त्‍यांचे वडील रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेले हाेते. हालचाल दिसत नव्हती. त्‍यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तपास पोहेकॉ गजानन चोपडे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: