बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

उद्या, परवा जिल्ह्यात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उद्या (31 मार्च) आणि परवा (1 एप्रिल) उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. नागरिकांनी उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. शेतकरी बंधूंनी शेतातील कामे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतच करावी. जनावरांना सावलीमध्ये किंवा गोठ्यामध्ये बांधून ठेवावे. त्यांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र,कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी केले आहे. खामगावात आज 40 अंशापार तापमान गेले होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: