क्राईम डायरीमुख्य बातम्या

उसने पैसे देण्याच्‍या आमिषाने शेगावमध्ये बोलावून युवतीवर मित्राचा बलात्‍कार!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उसने पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावून मित्राने युवतीवर बलात्कार केल्याची घटना शेगावात 9 फेब्रुवारीला दुपारी 3 च्‍या सुमारास घडली. युवतीने काल, 8 मार्चला शेगाव शहर पोलीस ठाण्यात येऊन 30 वर्षीय युवकाविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले, की अकोला येथील ३१ वर्षीय युवतीसोबत पारस येथील चेतन जामोदकर (३०) याने मैत्री केली. मैत्रीत तिचा विश्वास संपादन केला. 9 फेब्रुवारी रोजी तिला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगावला बोलाविले. शिवालय गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेऊन बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत युवतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, चेतन जामोदकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: