चंदेरी

एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री झाली सर्वांची ‘नकुशी‘

मुंबई : तुम्हाला छोट्या पडद्यावरील ‘लागी तुझसे लगन‘ ही मालिका आठवतेय का? त्यातील लोकप्रिय अभिनेत्री माही वीज आठवतेय का? माही वीजने या मालिकेत ‘नकुशी‘ हे कॅरेक्टर पार पडले होते व ते चांगलेच लोकप्रिय ठरले होते, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले होते. यानंतर माहीने अनेक मालिकांमधून दमदार रोल केले. त्यामुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माहीची ओळख तयार झाली. पण दरम्यानच्या काळात माहीचे अभिनेता जय भानुशाली याच्यासोबत अफेअर सुरू झाले. अनेक वर्षे दोघांनी डेटींग केल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये एकमेकांशी गुपचूप लग्न केले.बरीच वर्षे इंडस्ट्रीला त्याची खबरबात नव्हती.पण अशा गोष्टी फार लपूनही राहत नाहीत. वर्ष‘-दीड वर्षानंतर त्यांच्या लग्नाची माहिती इंडस्ट्रीला समजली. शिवाय लग्नानंतर माहीने ओव्हरटाईममध्ये काम करणे बंद केले.कारण तिच्यावर कुटुंबाची जबाबादारी होती व पतीलाही तिला वेळ द्यायचा होता.याचा परिणाम अखेर व्हायचा तोच झाला.माहीने त्यावेळी इंडस्ट्रीपासून काही काळ दूर राहण्याचे ठरवले. पण हा निर्णय तिच्यासाठी बराच अडचणीचा ठरला. नंतर काम मिळवणे तिच्यासाठी पहिल्याइतके सोपे राहिले नाही. ‘बालिका वधू‘ मालिकेतून माहीने कमबॅक केले. पण तिला त्यावेळी मुख्य नव्हे तर सहाय्यक अभिनेत्रीचा रोल मिळाला. पुढे शुभ कदम, रिश्तों की बडी प्रथा यासारख्या काही मालिका व रिअ‍ॅलिटी शोजमधून तिला तशीच कामे मिळत गेली. पण माही त्याला वैतागली.माहीला मुख्य भूमिका हव्या होत्या. त्यामुळे तिने दुय्यम भूमिका नाकारल्या. आज तिच्याकडे मेन किंवा सह अशा कुठल्याच भूमिका नाहीत. त्यामुळे एकेकाळी लोकप्रिय असलेली ही अभिनेत्री आज सर्वांना नकुशी झाली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: