बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

“एसटी’ची रातराणी सेवा २० ऑगस्टपासून

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एस. टी. महामंडळाची रातराणी बस सेवा कोविडमुळे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा २० ऑगस्टपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

रातराणी बससेवेत बुलडाणा ते नागपूर रात्री ९ वाजता, बुलडाणा ते पुणे रात्री ९. १५ वा., मेहकर ते पुणे रात्री ७.३० वा., मलकापूर ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायंकाळी ६.३० वाजता आदींचा समावेश आहे. सद्यःस्थितीत महामंडळ जलद, वातानुकूलित शिवशाही आदी सेवेद्वारे प्रवाशी वाहतूक करत आहे. २० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या रातराणी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: