क्राईम डायरी

एसटी बसने दुचाकीला उडवले; एक ठार एक जखमी; कव्हळा फाट्याजवळील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव एसटी बसने दुचाकीला मागून धडक दिली. यात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना काल, 23 फेब्रुवारीला सकाळी चिखली- खामगाव रोडवरील कव्हळा फाट्याजवळ घडली.

सकाळी 9 च्या सुमारास ईसोली येथील दत्तात्रय श्रीराम शेळके (48) व विष्णू मुरलीधर शेळके (35, दोघे रा. ईसोली) हे कव्हाळा येथे दुचाकीवर जात होते. शेगाव-पुणे ( क्र. एमएच-13-सीयू-6927) बसने त्‍यांना उडवले. यात दत्तात्रय शेळके जागीच ठार झाले, तर विष्णू शेळके गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: