क्राईम डायरीमुख्य बातम्या

ऑर्डर ऑर्डर… फुल क्षमतेने जिल्ह्यातील न्यायालये अखेर सुरू! अशी राहील वेळ; हजारो वकील, पक्षकारांना दिलासा!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमीअधिक 10 महिन्यांपासून प्रभावित झालेले जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज आज, 1 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू झालं आहे! परिणामी आता न्यायमंदिरात पूर्ण वेळात सर्व प्रकारच्या प्रकरणांचे वा खटल्यांचे कामकाज होणार असून वॉरंट, समन्सची देखील तामील होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो वकील व पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी मार्च 2020 मध्ये राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने दीर्घकाळ लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्व क्षेत्र लॉक झाले. यातून न्यायालये देखील सुटली नाहीत. वर्षाअखेर अर्थात दिवाळीच्या आसपास विविध क्षेत्रांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले. यामध्ये न्यायालयाचाही समावेश होता. मात्र कोर्टाची वेळ व प्रकरणांची संख्याही मर्यादित होती. या पार्श्‍वभूमीवर मुंबई हायकोर्टाने जिल्ह्यातील सर्व कोर्टांचे कामकाज 1 फेब्रुवारीपासून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश बजावले. याची बुलडाणा जिल्ह्यात आज सोमवारच्या मुहूर्तावर अंमलबाजवणी करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले. आजपासून फुल टाईम कामकाज सुरू झाले असतानाच कोरोना विषयक सर्व मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.
दृष्टिक्षेपात टाइम टेबल
आदेशानुसार जिल्ह्यातील 4 सेशन कोर्टसह दिवाणी न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5.45 अशी आहे. दुपारी 2 ते 2.45 वाजेदरम्यान रिसेस राहणार आहे. कार्यालयीन वेळ 10.30 ते संध्याकाळी 6 अशी असून दुपारी 2 ते 2.30 दरम्यान सुटी राहणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळ सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 अशी आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: