चंदेरी

करीना कपूर करतेय वजन कमी


पुन्हा पडद्यावर झळकण्यासाठी उत्सूक; ‘झीरो फिगर‘साठी जीममध्ये गाळतेय घाम

मुंबई : ‘झीरो फिगर‘ संकल्पनेमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आलेल्या बेबो गर्लच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज‘ आहे.आता तुम्ही म्हणाल करीनाकडून खर्‍या आयुष्यात दोन ‘गोड न्यूज‘ प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा तशी अपेक्षा कशी ठेवता? पण करीना कपूर पुन्हा पडद्यावर झळकणार हीच तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी ‘गुड न्यूज‘ आहे. अर्थात ती सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार की, पती सैफ अली खानचा आदर्श समोर ठेवून वेब सीरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.पण करीना कपूर उर्फ बेबो गर्ल पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास उत्सूक आहे. कोणत्याही विवाहित अभिनेत्रीसाठी त्यातही दोन मुलांची माता झाल्यानंतर सिनेसृष्टीत कमबॅक हे फार मोठे आव्हान असते. कारण वजन आणि वाढते वय. चाहते आता पूर्वीसारख्या गुलगुलू भूमिकांमध्ये त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला पाहू शकत नाहीत. करीनाने मात्र कमबॅकचे फारच मनावर घेतले आहे. तिने त्याची सुरूवात वजन कमी करण्यापासून करण्याचे ठरविले असून तिने त्यासाठी पुन्हा एकदा नियमित जीम जॉइन केला आहे. जीममध्ये घाम गाळून पुन्हा एकदा झीरोफिगर मेन्टेन करण्याचा तिचा प्रयत्न आहे. करीनानेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती बाळंतपणानंतरच्या वाढलेल्य वजनाच्या तुलनेत बरीच स्लीम दिसत आहे. ब्लॅम मास्क व ब्लॅक जीम ड्रेसमध्ये वजन कमी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेली ही सौंदर्यवती अभिनेत्री तिचे झीरो फिगरचे टार्गेट किती दिवसांत साध्य करते व पडद्यावर कधी झळकते याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बाय द वे आमीर खानसोबतच्या लालसिंग चढ्ढा या चित्रपटातही करीना झळकणार आहे.!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: