क्राईम डायरी

काँग्रेसनगर येथील तरूण घरून निघून गेला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील काँग्रेसनगरमधून विश्‍वनाथ लक्ष्मण सोनुने यांचा मुलगा सतिष विश्‍वनाथ सोनुने (37) हा 21 डिसेंबर रोजी राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही. त्याचा रंग गोरा असून, उंची 5 फूट 9 इंच आहे. अंगात बदामी रंगाचे चौकडीचे शर्ट, लालसर कथीया रंगाचे जॅकेट, गळ्यात पांढरा रूमाल, डोक्यात वूलनची काळसर रंगाची टोपी, काळी पँन्ट व पायात भुरकट रंगाची सँडल घातलेली आहे. या वर्णनाचा तरूण इसम कुणालाही आढळून आल्यास किंवा दिसल्यास त्वरित बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या 07262-242327 व 7972502295 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बुलडाणा शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: