बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

काँग्रेस 14 एप्रिलपासून राबविणार रक्तदान मोहीम; जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची माहिती

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रक्ताचा उद्‌भवलेला तुटवडा पाहता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिलपासून काँग्रेस संपूर्ण जिल्हाभरात रक्तदान मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली.

मोहिमेच्‍या पूर्वतयारीच्‍या अनुषंगाने जिल्हा काँग्रेसतर्फे 10 एप्रिलला ऑनलाइन बैठक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा बुलडाणा जिल्हा संपर्क मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा काँग्रेसतर्फे कोविड हेल्पलाईन सेंटरची उभारणी करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल निहाय आरोग्य सेवकांची निवड करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.  यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जि.प. अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, श्यामभाऊ उमाळकर, पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, प्रसेनजित पाटील, मनोज कायंदे, दीपक देशमाने, गणेशराव पाटील कैलास सुखदाने , प्रकाश पाटील, राजीव पाटील, ज्योतीताई ढोकणे, समाधान सुपेकर, डॉ. अनिल खलसे, लक्ष्मणदादा घुमरे, विजय अंभोरे, राम डहाके, कलीम खान, अनंतराव वानखेडे, डॉ. अमोल लहाने, आकाश जयस्वाल, जयश्रीताई शेळके, ॲड. शरद राखोंडे, आरतीताई दीक्षित, मीनलताई आंबेकर, जयंत खेळकर, विनोद पऱ्हाड, डिगंबर मवाळ, संजय ढगे, सुनिल तायडे, सतिश मेहेंद्रे, राजेश मापारी, भगवान धांडे, अतहरोद्यीन काझी, जगन ठाकरे, सुनिताताई देशमुख, किशोर भोसले, मिनाक्षी हाडे, प्रकाश धुमाळ, ॲड. प्रशांत देशमुख, सुरजसिंग तोमर, विजय काटोले,  सुनिल सपकाळ, किशोर कदम, डॉ. धनोकार, अविनाश उंबरकर, अर्जुन घोलप, पवन जाधव, विजयसिंग राजपूत, बाळगजानन पाटील, सत्यजित खरात, विकास देशमुख, श्रीकृष्ण केदार, सिध्दार्थ खरात, सुनिल जायभाये, रमेशचंद्र घोलप आदी पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन चर्चेत सहभाग घेतला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: