खामगाव (घाटाखाली)

कामगारांना तातडीने द्या मदतनिधीचा लाभ; असंघटीत बांधकाम कामगार विंगची मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः असंघटित क्षेत्रात कार्यरत इतर कामगार व बांधकाम कामगारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरले असून, आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अट टाळावी. सर्व ऑनलाईन नोंदणी व नुतनीकरण करणार्‍या कामगारांना मदत निधीचा लाभ द्यावा, अशी मागणी असंघटीत बांधकाम कामगार विंगचे राज्य कार्यकारी सदस्य मच्छिंद्र लक्ष्मण बोराडे यांनी  निवेदनाव्दारे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व  वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे. घाटाखालील मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव व जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्याकरिता शेगाव येथे कामगार नोंदणी व नुतनीकरणासाठी सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, असेही निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर  मच्छिंद्र बोराडे, कमलाकर पहुरकर, शेख फिरोज, दीपक गायकवाड, अ.अजिम, चंद्रमणी पहुरकर आदींच्या स्वाक्षर्‍या  आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: