क्राईम डायरीमुख्य बातम्या

कारमध्ये आढळले देशी-विदेशी दारूचे घबाड!; चिखलीत एकाला पकडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देशी व विदेशी दारू अवैधरित्या घेऊन जाणाऱ्याला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने  (एलसीबी) रंगेहात पकडले. त्याच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई चिखली शहरात काल, 12 मार्चला रात्री उशिरा बसस्थानक परिसरातील शेगाव कचोरी सेंटरसमोर करण्यात आली. शरद तुळशीदास बोरकर (रा. चिखली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

‘एलसीबी’ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, शेगाव कचोरी सेंटरजवळ शरदच्या वाहनाची तपासणी केली असता गाडीतून 10 बॉक्समध्ये देशी- विदेशी कंपनीच्‍या दारूच्‍या 896 शिश्या आढळल्या. एलसीबीने त्या जप्त केल्या. ज्या वाहनात या शिश्या ठेवण्यात आल्या होत्या. ते वाहन असा एकूण 2 लाख 4 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने ‘एलसीबी’चे पोलीस अंमलदार अताउल्ला खान, विजय सोनोने व  चिखली पोलीस स्टेशनचे अंमलदार राजू सोनुने, गजानन जाधव यांनी पार पाडली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: